मराठी सुविचार छोटे | Lahan Marathi suvichar
नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्ट मधे पाहणार आहोत मराठी सुविचार छोटे, मराठी लहान सुविचार , तसेच शालेय सुविचार, शाळेतील छोटे सुविचार, ३००+ मराठी छोटे सुविचार यामधे आहेत , तुम्हाला ते नक्कीच आवडतील . चला तर मग पाहूया. short marathi suvichar
marathi suvichar short
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे
असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.
पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे
सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !
स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.
चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.
अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
क्रोध माणसाला पशू बनवतो.
आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !
कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
परमेश्वर खऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.
भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.
माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
मराठी सुविचार छोटे |
10 छोटे सुविचार मराठी
शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात. आणि नुसते सुविचार असुन चालत नाही; ते आचरणात आणावे लागतात.
सुविचार मराठी छोटे photo | Small Marathi Suvichar Photo
जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !
लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
हृदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर हक्क दुर पळतात.
हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.
जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.
अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते. तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.
न मागता देतो तोच खरा दानी.
चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
आजचा सुविचार | Today Marathi Suvichar
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
Small Suvichar Marathi |
एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
अतिथी देवो भव ॥
अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
चांगले सुविचार | Good Thought In Marathi
नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
सत्याने मिळतं तेच टिकतं.
जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
जो गुरुला वंदन करतो; त्याला आभाळाची उंची लाभते.
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी
क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.
मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते
आत्मविश्वास सुविचार मराठी / Possitive Attitude Status.
Lahan Marathi Suvichar |
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी!
खिडकी म्हणजे आकाश नसतं.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
आपण जे पेरतो तेच उगवतं.
फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
आधी विचार करा; मग कृती करा.
जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे
वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.
कविता म्हणजे भावनांचं चित्र!
संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
तुलना करावी पण अवहेलना करू नये.
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे.
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
मराठी सुविचार छोटे
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही
पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
Lahan Marathi suvichar / लहान मराठी सुविचार
अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन!
अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
अंथरूण बघून पाय पसरा.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
शरीरमाध्यम खलुं सर्वसाधनम ॥
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दूर्मिळ असते.
ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
Small Marathi Suvichar | स्मॉल मराठी स्टेटस
रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा.
जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात.
हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.
नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
हसा, खेळा पण शिस्त पाळा.
आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!
उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका
जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?
जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.
मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
ऐकावे जनाचे करावे मनाचे.
एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
सुविचार मराठी छोटे 50
स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !
जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या
दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
१जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.
मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.
स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.
जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्ण असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा…। हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.
क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
वैभव त्यागात असते, संचयात नाही.
तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.
मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.
पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
ह्रदयात अपार प्रेम असले की सर्वत्र मित्र.
टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.
शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.
दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.
जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥
सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.
ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.
Search Terms - मराठी सुविचार छोटे, मराठी लहान सुविचार , तसेच शालेय सुविचार, शाळेतील छोटे सुविचार, ३००+ मराठी छोटे सुविचार, 10 छोटे सुविचार मराठी, सुविचार मराठी छोटे 50, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार संग्रह, 200 मराठी सुविचार छोटे, चांगले सुविचार मराठी, 100 मराठी सुविचार, सुविचार मराठी छोटे 50
Harshal vishwas Patil
ReplyDeleteमुलं व मुलीचा सुविचार पाठवा लव्ह कर पाठवा
ReplyDelete