Maharashtra Dinachya Hardik Shubhechha in Marathi | महाराष्ट्र दिन शुभेच्छा | महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस शुभेच्छा मराठी
नमस्कार मित्रांनो, आज १ मे , महाराष्ट्र आणि कामगार दिन त्या बद्दलची ही पोस्ट यामधे आपण महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो ?, महाराष्ट्र दिन शुभेच्छा, Maharashtra Dinachya Hardik Shubhechha in Marathi , पाहणार आहोत.
महाराष्ट्र दिन शुभेच्छा |
१९५६ च्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या नियमानुसार राज्याच्या सीमा ह्या भाषेच्या आधारावर सीमित करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मराठी आणि कोंकणी भाषिकांसाठी मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची मागणी करण्यात आली होती, तसेच गुजराती आणि कच्छी भाषिक जनतेसाठी देखील वेगळ्या राज्याची मागणी करण्यात आली. परंतु राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. या निर्णयावर महाराष्ट्रातील बरीच जनता चिडली होती. अनेक ठिकाणी कामगारांकडून या गोष्टीचा निषेध करण्यात आला. कामगारांचा मोर्चा आणि आंदोलनात पोलिसांचा लाठीचार्च आणि गोळीबार करावा लागला. सयुंक्त महाराष्ट्राच्या या लढ्यामध्ये १०६ आंदोलक बळी पडले.
मराठी माणसाच्या आंदोलनामुळे आणि या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे सरकारने अखेर नमते घेऊन १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. या हुतात्मयांच्या समरणार्थ हा दिवस महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
Maharashtra Day Quotes in Marathi Status | मराठी दिवस आणि कामगार दिवस शुभेच्छा
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
____________________________________
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
____________________________________
महाराष्ट्राची यशो गाथा
महाराष्ट्राची शौर्य कथा
पवित्र माती लावू कपाळी
धरती मातेच्या चरणी माथा..
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
____________________________________
अभिमान आहे मराठी असल्याचा
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा
जय महाराष्ट्र.
____________________________________
Maharashtra Day Quotes in Marathi / Status
महाराष्ट्र दिन शुभेच्छा |
महाराष्ट्र दिनाच्या सर्व
महाराष्ट्र वासियांना तसेच
मराठी बांधवांना मनापासून
कोटी कोटी शुभेच्छा.
____________________________________
रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणार्यानभा
अस्मानाच्यासुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचासिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा.
____________________________________
माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!
____________________________________
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
____________________________________
महाराष्ट्रीय असण्याचा..
आम्हाला गर्व आहे
मराठी भाषेचा..
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
____________________________________
माती झालो तर ‘महाराष्ट्राची’ होईन!
तलवार झालो तर ‘भवानी मातेची’ होईन!
आणि…
पुन्हा मानव जन्म मिळाला तर ‘मराठीच’ होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!
____________________________________
दगड झालो तर सह्याद्रीचा होईन !
माती झालो तर महाराष्ट्राची होईन!