मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी मध्ये | Mobile Shap ki Vardan in Marathi Nibandh

मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी मध्ये | Mobile Shap ki Vardan in Marathi Nibandh 



मराठी निबंध मोबाईल शाप की वरदान 

नमस्कार मित्रांनो आज आपण निबंध घेऊन आलो आहे , जो की शाळेतील मुलाना फार उपयोगी पडेल. तसे बरेच मराठी निबंध आहेत पण जो सध्या जास्त विचारता ते latest घडामोडींवर आधारित, जस की technology , विज्ञान तसाच आजचा विषय आहे तो म्हणजे मराठी निबंध मोबाईल शाप की वरदान..चला तर मग बघू 

In this Post Cover This Topics : - मराठी निबंध मी मोबाईल बोलतोय ,marathi nibandh on mobile shap ki vardan , मराठी निबंध मोबाईल शाप की वरदान , mobile shap ki vardan in marathi vaicharik nibandh , मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी मध्ये ,mobile shap ki vardan in marathi nibandh, हे सगळे.

सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रातील तंत्रज्ञान फारच विकसित झालेले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान तर इतके वाढले आहे कि ती एक मोठी क्रांतीच झालेली जाणवते. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे. घराघरातील प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाईल पहावयास मिळत आहे. त्यातही विलक्षण अशी विविधता आलेली आहे. घरातल्या फोनची जागा या मोबाईलने केव्हाच घेतली आहे. अशा या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे कधी-कधी मोबाईल नकोस वाटू लागतो. त्यातूनच प्रश्न निर्माण होतो – ‘ मोबाईल शाप कि वरदान ?

पण, ज्यावेळी एखादे नवीन तंत्रज्ञान निर्माण होते तेव्हा ती मानवी सुखसोयी या दृष्टीनेच उदयास येते. मानवाचे कल्याण साधणे हाच एकमेव हेतू या तंत्रज्ञानामागे असतो. मोबाईलसुद्धा एक विकसित स्वरुपाचे तंत्रज्ञान आहे, ते शाप कसे असेल? ते एक फार मोठे वरदानच आहे. फक्त मोबाईलचा नको तितका आणि नको तसा अतिरिक्त वापर केला जातो, त्यावेळी हा मोबाईल शापच वाटू लागतो, मग तो दुसऱ्याचा असो किंवा आपलाच असो. आपल्याच मोबाईलवर येणारे ते कॉल्स, ते एस. एम. एस. रात्रीअपरात्री केव्हाही येतात. अक्षरश: पिच्छाच पुरवितात. अर्थात, स्विच ऑफ ने त्याचा बंदोबस्त होऊ शकतो परंतु हे प्रत्येक वेळी स्विच ऑफ चालत नाही किंवा कधी कधी स्विच ऑफ करणे राहूनच जाते. हे झाले आपल्या मोबाईलचे पण दुसऱ्याच्या मोबाईलची तर बातच अलग.

कसले हि भान न राखता, तासनतास मोबाईलवर गप्पागोष्टी करणारे पुरुष, महिला आपल्याच मस्तीत गुंग असतात. अगदी सुखानेच वार्तालाप चालू असतो. महिला वर्ग तर कित्येकदा आजचा मेनू काय इथपासून त्याची आख्खी रेसीपी मोबाईलच्या माध्यमातून घेत असतात अशा वेळी त्या मोबाईलचा आपल्याला होणारा त्रास,दुसऱ्याला होणारा त्रास. कितीतरी वेळ बोलत राहिल्यामुळे स्वतःलाच भरावे लागणारे बिल, स्वतःच्या व इतरांच्या ही आरोग्यावर होणारा परिणाम, होणारे प्रदूषण हे सारे अटळच असते. पण लक्षात कोण घेतय. कळते पण वळत नाही. तीच गत मोबाईलच्या वापराची असते. तसे पाहिले तर पुर्वीच्यासारखी मोबाईल हि चैनीची वस्तू राहिलेली नाही.

मोबाईल हा आजच्या काळातील प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटकच बनला आहे. एक अत्यावशक घटक! युवावर्ग, महिलावर्ग यांच्याकडे मोबाईल,सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यकच असतो. कोणतीही अप्रिय घटना, प्रसंग, अपघात घडल्यास घरच्या मंडळीशी संपर्क साधता यावा या दृष्टीने मोबाईल सारखे दुसरे जलद व प्रभावी साधन नाही. एकाक्षणात एकमेकांशी संपर्क साधून व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य तो निर्णय त्वरित घेता येतो, त्यावेळी मोबाईल वरदान नाही असे कोण म्हणेल? वेळ, पैसा, श्रम वाचविण्यासाठी  व त्यांचा अन्य चांगल्या कामांसाठी वापर करता येऊ शकतो. जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी कुठेही मोबाईलच्या माध्यामातून आपण पोहोचू शकतो. आज तर असे काही मोबाईल तंत्रज्ञान विकसित केले आहे कि मोबाईल हँडसेटच्या त्या छोट्या स्क्रीनवर आपण संवाद साधलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहू शकतो. केवढी ही मोबाईल क्रांती झाली आहे, बर?

 एखाद्या दूर देशीच्या, दूर ठिकाणाची इत्यंभूत माहिती मोबाईलवरून घेऊ शकतो. मोबाईलद्वारे एखाद्या ठिकाणचे हवामान, तापमान आपण समजू शकतो,आवडते संगीत ऐकु शकतो. मोबाइलवरच कॅमेराची सोय असल्यामुळे कुठेही अगदी कसलेही (निसर्गाचे वा सभा-संमेलनाचे) फोटो काढता येतात. इतके सारे फायदे पाहिल्यावर मोबाईल ‘वरदान’ नाही असे कोण म्हणेल? पण त्याचा वापर मात्र योग्य तऱ्हेनेच केला गेला पाहिजे हे ही तितकेच सत्य आहे. मोबाईलचा नको तितका व नको तसा अतिरिक्त वापर करणे सर्वार्थाने चूक आहे.

त्याचा तसा वापर करणे हे नुसतेअयोग्यच नव्हे तर कित्येकदा ते घातकच आहे. कित्येकदा मोटरमेन  किंवा मोटारसायकलस्वार आपले वाहन चालविताना खुशाल मोबाइलवर बोलत असतो. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असते. तरीही हे सारे घडतेच आहे. नियम धाब्यावर बसवून कायद्याचे उल्लंघन करून वाट्टेल तिथे मोबाईलचा  वापरकेलेला दिसतो  हे प्रकार सर्रास दिसून येत आहेत. परवाच मी चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याला बाईक चालवत असताना फोनवर बोलताना मी पहिले आहे. त्यावेळी मी त्याला हटकण्याचा प्रयत्न ही करेन पण तो वेगाने गाडी चालवत होता अन मी एका ‘पादचारी सडकपार’ अशा अवस्थेत होतो. सांगायचे तात्पर्य इतकेच कि असा हा मोबाईलचा वापर टाळला पाहिजे. मोबाईलवरचा एस. एम. एस. प्रकार तर किती तरी गुन्हयांना निमंत्रण देणारा असतो. कधी कधी तर पोलिस स्टेशनचे खेटेही घालावे लागतात. हे सारे प्रकारअसतात मोबाईलचे – मोबाईल धारकांचे!

Mobile Shap ki Vardan in Marathi  | मोबाइल शाप की वरदान मराठी भाषण 

मोबाईलवरून सारखे फोन करत राहणे, एखाद्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार असू तर त्यासाठी कमीत कमी ५ ते ७ फोन्स तर आवश्यकच होत असतात. खर तर मोबाईल नसतानाही भेटी गाठीचे प्लानिंगअगदी पद्धतशीरपणे होत असे. मोबाईलमुळे अधिक कार्यक्षम होतो हे हि खरेच! कित्येकदा मोबाईलचा खूप त्रास हि होतो, वाट्टेल त्या ठिकाणी मोबाईलवरून मोठ्यामोठ्याने बोलले, सभासद्स्थानी ही मोबाईल चालूच ठेवले. कधी कधी  तर मोबाईलवरून इतक्या मोठ्या आवाजात बोलतात कि बोलणाऱ्याला सांगावेसे वाटते “अरे बाबा, आणखीन जरा आवाज वाढविलास तर तो मोबाईल न वापरताही तुझे नुसते बोलणेही त्याला ऐकू जाईल. मोबाईल सगळीकडेच असतो पण त्याचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. मोबाईलवरचा कॅमेराही कधी कधी कुरापत काढणारा; गुन्ह्यात भर टाकणारा ठरतो. मिस्सड कॉल हा ही त्यातलाच एक प्रकार!

याशिवाय मोबाईलचा अतिरिक्त वापर हा अनेक शारीरिक व्याधींना निमंत्रण देणारा असतो. मेंदू, किडनी,हृदय इ. अवयवावर हि मोबाईल फार मोठा परिणाम करू शकतो. एकूणच काय, तर मोबाईलचा योग्य वापर केला तर मोबाईल वरदानच आहे नाही तर शाप!

आपण या मधे पाहिलं की mobile shap ki vardan in marathi essay , मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध लेखन , mobile shap ki vardan marathi nibandh lekhan, मोबाइल शाप की वरदान मराठी भाषण , मित्रांनो कशी पोस्ट वाटली कॉमेंट करून नक्की सांगा.

                       

Post a Comment

Previous Post Next Post