Marathi Kavita | पोळा

जय शिवराय मित्रांनो आज पोळा सण ,आपण सर्वांनी साजरा केला असेल ...तर तो पोळा सण ज्या साठी आहे  , त्यासाठी एक सुंदर कविता  मी घेऊन आलो आहे ....तर चला तर मग बघुया.
 

Marathi Kavita

तुझ्या शेतात राबुनी  माझी सरली हयात

नको करू हेटाळणी

आता उतार वयात ॥ १ ॥


नाही राजा ओढवत

चार पाउले नांगर

नको बोलूस वंगाळ

नको म्हणूस डंगर ॥ २ ॥


माझ्या ऐन उमेदीत

माझी गाईलीस ओवी

नको चाबकासारखी

आता फटकारु शिवी !! 3 !!


माझा घालावाया शीण

तेव्हा चारलास गूळ

कधी घातलीस झूल

कधी घातलीस माळ ॥ ४ ॥ 


अशा गोड आठवणी

त्यांचे करीत रवंथ !

मला मरण येऊ दे तूझ्याच गोठ्यात 

तुझे कुशल चिंतीत ॥ ५ ॥


मेल्यावर तुझे ठायी

पुन्हा एकदा रुजू दे !

माझ्या कातड्याचे जोडे

तुझ्या पायात वाजू दे ॥ ६ ॥ 


नको मला पुरणपोळी ।

मी कधी रुसणार नाही ।

मालक , 

मला फक्त एक वचन द्या । 

तुम्ही आत्महत्या करणार नाही !

आणि 

मी कत्तलखाण्यात मरणार नाही ॥

🙏🏻😊😊😊🙏🏻  

 !! जय बळीराजा !!

 🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

Previous Post Next Post